तलवार घेवून व्हिडिओ बनवणे महागात


20/01/2023 18:09:03 PM   Sweta Mitra         1सध्या तरुणांमध्ये टिक- टॉक नंतर इंस्टाग्रामवर रिल्स बनवण्याचे वेड निर्माण झाले आहे. आपल्या व्हिडिओला भरपूर लाइक्स आणि कमेंट्स मिळाव्यात, फॅन फॉलोविंग वाढावी असे अनेक इंस्टाग्रामवर अॅक्टिव्ह असलेल्या तरुण-तरुणींना वाटत असतं. नाशिकमध्ये एका हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर तलवार घेऊन रिल्स बनवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. रिल्स बनवून पोस्ट केल्यानंतर त्याचे परिणाम देखील त्याला भोगावे लागले आहेत.
एका हिंदी चित्रपटाच्या गाण्यावर हातात धारदार तलवार घेऊन रिल्स बनवला आणि तो रिल्स नाशिकच्या गुन्हे शाखेच्या हाती लागला आणि पोलिसांनी त्या तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. नाशिक शहरातील भारत नगर येथे राहणाऱ्या १९ वर्षीय संशयित फैजान नईम शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे असलेली तलवार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली.
एकीकडे नाशिक शहरात गुन्हेगारी वाढत असताना दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून बेकायदा शस्त्रे हातात घेऊन दहशत माजवत आहेत. आता अशा उपद्रवींवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली असून सोशल मीडियावरील रिल्स बनवणाऱ्या तरुणाला आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              maharashtra nashik talwar video samachar BreakingNews india newsupdates dailynews dailynewsupdate