20/01/2023 18:10:11 PM Sweta Mitra 4
यंदा आयपीएलचा सोळावा हंगाम खेळला जाणार आहे. आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला एप्रिलमध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२३ साठी सर्व १० संघानी आपली कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये संघांनी आपल्या संघातील खेळाडू निश्चित केले आहेत. अशात भारतीय संघाचा माजी आणि सीएकेचा कर्णधार एमएस धोनीनेदेखील तयारी सुरु केली आहे. ज्याचा व्हिडिओ होत आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएलची तयारी सुरू केली आहे. तो झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे सराव करत आहे. ज्याचा व्हिडिओ आला आहे. धोनी आणि सीएसके चाहत्यांसाठी हे आयपीएल खास असणार आहे, कारण धोनी क्रिकेटर म्हणून मैदानात उतरण्याची ही कदाचित शेवटची वेळ असेल. या आयपीएलनंतर धोनी लीग क्रिकेटमधूनही निवृत्ती घेऊ शकतो.
धोनीला त्याचा शेवटचा सामनाही घरच्या मैदानावर खेळायची इच्छा आहे. तसेच यावेळी आयपीएल फक्त होम आणि अवे फॉरमॅटमध्येच खेळवली जाईल. ४ वर्षांनंतर सीएसके त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे, जे चाहत्यांसाठी एक वेगळीच भावना असेल. धोनीने या हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. तो नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत आहे. धोनीच्या सरावाचा व्हिडिओ सीएसकेच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे.