LIVE: भारत vs न्यूझीलंड दुसरा ODI


21/01/2023 17:55:57 PM   Sweta Mitra         8









भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  
भारत ने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. आजची प्लेईंग 11 पुढील प्रमाणे आहे.-रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज. 
या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून आता दुसरा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान भारताने आजचा हा सामना जिंकल्यास मालिकाही भारताच्या नावावर होणार आहे. तर दुसरीकडे मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी न्यूझीलंड संघाला आज विजय मिळवावा लागणार आहे.






also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  



TAGS :              LIVE India New Zealand ODI cricket