टीम इंडियाची ड्रेसिंग रूम


21/01/2023 17:57:48 PM   Sweta Mitra         6
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शनिवारी रायपूर येथे तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा वनडे सामना खेळवला जाणार आहे. हा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे होणार आहे. रायपूरमध्ये होणारा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे. दरम्यान, टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू युजवेंद्र चहलने त्याच्या प्रसिद्ध 'चहल टीव्ही'द्वारे केवळ रायपूर स्टेडियमचा दौरा केला नाही तर खेळाडूंची ड्रेसिंग रूम आणि खेळाडूंना जेवणासाठी कोणकोणते पदार्थ आहेत हेही दाखवले.
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर २१ जानेवारीला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील हा दुसरा सामना आहे, अशा परिस्थितीत खेळपट्टी कशी आहे आणि कोण जिंकणार या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर चहलने व्हिडीओद्वारे चाहत्यांना भारतीय ड्रेसिंग रूमची सफर घडवून आणली. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. चहलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Team India dressing room food