22/01/2023 17:54:05 PM Sweta Mitra 5
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे 82 व्या वर्षी निधन झाले आहे. वरोरा येथे राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या निधनाने वरोरा विधानसभा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले,1 मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे.
अॅड. मोरेश्वर टेमुर्डे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. टेमुर्डे यांनी 1991 ते 1995 आणि 95 ते 2000 या काळात दोनदा वरोरा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले. अॅड. मोरेश्वर टेमुर्डे हे 1991 -95 या काळात विधानसभा उपाध्यक्ष होते.
टेमुर्डे यांचा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या उभारणीत मोठा वाटा होता. राजकारणात अत्यंत सक्रिय असलेले अॅड. टेमुर्डे राजकीय स्थितीवर पोटतिडकीने भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या जाण्याने टेमुर्डे कुटुंबावर दु:खाच डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले 1 मुलगी व मोठा परिवार आहे.