22/01/2023 17:57:47 PM Sweta Mitra 7
ठाकरे सरकारने गुंडाळलेल्या आपल्या जुन्या योजना आणून, त्या राबविण्याचा सपाटा शिंदे-फडणवीस सरकारने लावला आहे. फडणवीस यांच्या पुढाकारातील मात्र, काही काळ बंद राहिलेली ‘मुख्यमंत्री फेलोशिप योजना पुन्हा सुरू होणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी करण्याची राज्य सरकारने केली आहे. यासंदर्भात संबंधित खात्याला सूचनाही केल्या आहेत. राज्यात युती सरकारचे असताना म्हणजे, फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.
त्यानुसार २०१४-२०१९ या काळात तरुण-तरुणींना सरकारसोबत काम करण्याची संधी देण्याच्या उद्देशाने आखला होता. मात्र, ठाकरे सरकारच्या काळात ही योजना बंद करण्यात आली. त्यावरून महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांत आरोप-प्रत्यारोपही झाले.
मात्र, ठाकरे सरकार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. परंतु, शिंदे फडणवीस सरकारने युती सरकारमधील योजना सुरू करण्यास प्रारंभ केला. त्यात फडणवीस यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री फेलोशिप योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.