24/01/2023 18:07:57 PM Sweta Mitra 0
बँक ऑफ महाराष्ट्र येथे स्केल २ आणि ३ मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिसूचनेनुसार एकूण 225 जागा रिक्त आहेत. सर्व पदांसाठी किमान वयोमर्यादा २५ वर्षे आहे. प्रत्येक पदासाठी कमाल वयोमर्यादा वेगवेगळी आहे.
निवड झालेले उमेदवार 6 महिन्यांच्या प्रोबेशन पीरियडवर असतील. निवड झालेल्या उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्रसोबत दोन वर्षांचा करार करावा लागेल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करायचा आहे. बीओएम अधिसूचनेनुसार ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे.