17/02/2023 17:10:50 PM Sweta Mitra 19
भारतीय लष्करात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यासाठी भारतीय लष्कराने देशभरातील अग्निवीरांच्या निवडीसाठी नोटीफिकेशन जाहीर केले आहे. या भरती रॅली अंतर्गत आग्रा, ऐझॉल, अल्मोरा, अमेठी, बरेली, बराकपूर, बेहरामपूर, कटक, गोपालपूर, हमीरपूर आणि इतर ठिकाणांसह भारतीय सैन्याकडून आयोजित केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
भारतीय सैन्य अग्निवीर भरती रॅली २०२३ अंतर्गत अग्निवीर (सामान्य ड्यूटी), अग्निवीर (टेक्निक) (सर्व शस्त्र), अग्निवीर (लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल) (सर्व शस्त्र), अग्निवीर ट्रेसमन ही पदे भरली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अग्निवीर (सामान्य ड्यूटी) (सर्व शस्त्र) या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून एकूण ४५ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक विषयात ३३% गुण असावेत.
अग्निवीर (तांत्रिक) (सर्व शस्त्र) या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजीसह विज्ञान विषयातील १०+२/इंटरमीडिएट परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अग्निवीर (लिपिक / स्टोअर कीपर टेक्निकल) (सर्व शस्त्र) या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 60% गुणांसह इंटरमिजिएट (कला, वाणिज्य, विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अग्निवीर ट्रेड्समन (सर्व शस्त्र) या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आठवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षांपर्यंत असावे.
इंडियन आर्मी अग्निवीर भरती रॅली २०२३ निवड प्रक्रियेअंतर्गत पहिला टप्प्यात ऑनलाइन संगणक आधारित लेखी परीक्षा (ऑनलाइन CEE) आणि दुसऱ्या टप्प्यात भरती रॅली होणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागतील.
भारतीय सैन्य अग्निवीर रॅलीमध्ये सामील होऊ इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोटीफिकेशन पाहू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया १६ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. १५ मार्च ही अर्जाची शेवटची तारीख असून १७ एप्रिल २०२३ पासून ऑनलाइन भरती परीक्षा घेतली जाणार आहे.