24/02/2023 16:37:40 PM Sweta Mitra 18
अमरावती येथून एक दु:खद बातमी समोर आली आहे. माजी आमदार देवीसिंह शेखावत यांचं पुण्यात निधन झालं आहे. सकाळी 9:30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवीसिंग शेखावत भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती होते.
देवीसिंग शेखावत गेल्या दोन दिवसांपासून आजरी होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे पुण्यात केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावत चालली होती. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आज (शुक्रवारी) सायंकाळी 6 वाजता पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
अमरावतीचे प्रथम महापौर म्हणून शेखावत यांची ओळख होती. विद्याभारती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ते माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती अशी ओळख त्यांची सर्वदूर पसरली. कॉंग्रेस पक्षात सक्रीय सदस्य असलेल्या देवीसिंह हे 1991 मध्ये अमरावतीचे प्रथम महापौर बनले. 1985 साली अमरावती विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या देवीसिंह यांना विधानसभेच्या निवडणुकीत जिंकता आलं नाही.
निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्यांनी राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला. 7 जुलै 1965 रोजी त्यांचा विवाह पार पडला. राजस्थानच्या राज्यपालपदी ज्यावेळी प्रतिभा पाटील यांची नियुक्ती झाली. त्यावेळी दोघेही जयपूर राजभवनात राहत होते. त्यानंतर 2007 साली प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्या. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास सुरू ठेवला. अशातच त्यांच्या निधनाची बातमी आल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.