08/03/2023 16:46:26 PM Sweta Mitra 11
भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर मोठा अपघात झाला आहे. नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर हेलिकॉप्टर कोसळून अपघातग्रस्त झाले आहे. दरम्यान, या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अपघाताचे नेकमे कारण समजू शकलेले नाही.
भारतीय नौदलाचे अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टरला बुधवारी मुंबई किनार्यावर नियमित उड्डाण करत असताना अपघात झाला. नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईत कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. या अपघातातून नौदलाच्या तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.
हेलिकॉप्टरल कशामुळे अपघात झाले हे समजू शकलेले नाही. दरम्यान, हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
भारतीय नौदलाचे एएलएच मुंबईपासून नियमित उड्डाण करत असताना किनाऱ्याजवळ अपघात झाला. समुद्र किनाऱ्यावर हेलिकॉप्टरला अपघात झाल्यानंतर तात्काळ शोध आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. नौदलाच्या पेट्रोलिंग क्राफ्टने त्वरित शोध आणि बचाव सुरु केला. नौदलाच्या गस्ती क्राफ्टद्वारे तीन जणांच्या क्रूला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. या घटनेच्या आणि अपघाताचे कारण शोधण्यासाठी भारतीय नौदलाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.