प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या आईचे निधन


10/03/2023 16:41:06 PM   Sweta Mitra         17







भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानी जोरदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते.
आज या सामन्याचा दुसरा दिवस सुरु आहे. मात्र दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वीच एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा दुसरा कसोटी सामना झाल्यानंतर माघारी परतला होता. आता एक वाईट बातमी समोर आली आहे. पॅट कमिन्सच्या आईचे निधन झाले आहे. काही दिवसांपासून ते आजारी होत्या. मारिया यांना श्रद्धांजली देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आपल्या दंडावर काळ्या रंगाची पट्टी घालून मैदानात उतरले आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करत याबात माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की,'मारिया कमिन्सच्या निधनाने आम्ही सर्व दु:खी आहोत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वतीने आम्ही कमिन्स आणि त्याच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करतो. ऑस्ट्रेलियाचा संघ काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार आहे.'
मारिया यांना २००५ मध्ये ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे कळले होते. गेल्या काही आठवड्यापासून त्या आजारी देखील होत्या. बीसीसीआयने देखील ट्विट करत आम्ही पॅट कमिन्सच्या दुःखात सहभागी आहोत असे म्हटले आहे.




also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  



TAGS :              pat cummins australia mother demise TrendingNews TRENDINGNEWSTODAY samachar BreakingNews newsupdates dailynews dailynewsupdate latestnews news india anmnews