12/03/2023 17:51:42 PM Sweta Mitra 14
अभिनेत्री माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचं आज निधन झालं आहे. अभिनेत्री माधुरीवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. आई स्नेहलता यांचं आज सकाळी 8.40 वाजता निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. माधुरी दीक्षितची आई स्नेहलता यांच्या पार्थिवावर मुंबईत दुपारी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. आज दुपारी 3 वाजता वरळी येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माधुरी दीक्षितची आई स्नेहलता यांनी आज सकाळी 8.40 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं माधुरी आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. माधुरीसाठी तिची आई एक जिवलग मैत्रिण होती. आयुष्यातील प्रत्येक वळणावर तिला आई स्नेहलता यांची साथ लाभली. त्यामुळे आता आईच्या अचानक जाण्याने माधुरीच्या आयुष्यात न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने यांच्या आई स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी निधन झालं, याची माहिती माधुरी दीक्षितचे नातेवाईक रिक्कू राकेश नाथ यांनी दिली. स्नेहलता दीक्षित यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यानंतर माधुरी दीक्षितनं ही दु:खद बातमी शेअर केली आहे. माधुरीने सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहीलं आहे, माझी प्रिय आई स्नेहलता दीक्षित यांचं आज सकाळी निधन झालंय. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.