यो यो हनी सिंहचा वाढदिवस


15/03/2023 15:07:52 PM   Sweta Mitra         25
आपल्या गाण्यांनी आणि रॅपने प्रेक्षकांची मने जिंकणारा प्रसिद्ध गायक यो यो हनी सिंह आज (15 मार्च) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 15 मार्च 1983 रोजी पंजाबमधील होशियारपूर येथे झाला. हिरदेश सिंहचा ‘यो यो हनी सिंह’ झाला आणि त्याने केवळ उत्तम गाणी गायली नाहीत, तर उत्तम संगीतही दिले. जन्म पंजाबचा असला तरी तो लहानाचा मोठा दिल्लीत झाला.
दिल्लीतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर हनी सिंहने संगीत शिकण्यासाठी लंडनमधील ट्रिनिटी कॉलेज केंब्रिजमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो बराच काळ कामाच्या शोधात इंग्लंडमध्ये भटकला. स्वतः हनी सिंहने आपल्या अनेक मुलाखतींमध्ये याचा खुलासा केला आहे. याच दरम्यान एका रेकॉर्डिंगच्या निमित्ताने तो दिल्लीत आला होता. इथेच त्याला पहिली संधी संधी मिळाली आणि तो भारताचा ‘रॅप किंग’ बनला.
हनी सिंहने गायलेली 'हाय मेरा दिल', 'ब्राउन रंग', 'हाय हील्स', 'ब्रेकअप पार्टी', 'ब्रिंग मी बॅक', 'ब्लू आईज', 'इसे कहते है हिप हॉप हिप हॉप', 'देसी कलाकार', ‘रानी तू मैं राजा', 'पार्टी ऑन माय माइंड', 'लुंगी डान्स', 'पार्टी ऑल नाइट', 'सनी सनी', 'चार बॉटल वोडका', 'पार्टी विथ भूतनाथ', 'आता माझी सटकली', 'बर्थडे बॅश' ही गाणी आजही सर्वांच्या प्लेलिस्टमध्ये दिसतील.


also read:
For more details visit anmnewsmarathi.com
Follow us at https://www.facebook.com/anmnewsEnglish  TAGS :              Yo Yo Honey Singh singer pop birthday