05/02/2022 14:02:05 PM Sweta Mitra 205
आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,१०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,१०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,२०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,०५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,०६० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,१०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,२०० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१० रुपये आहे.