16/03/2023 17:03:28 PM Sweta Mitra 24
सीआयडीचे निर्माते प्रदीप उप्पूर यांचे निधन झाले आहे. वृत्तानुसार, निर्माते सिंगापूरमध्ये होते जेव्हा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीआयडीमध्ये एसीपी प्रद्युम्नची भूमिका करणारे अभिनेते शिवाजी साटम यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.
शिवाजी साटम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिलंय कि, “प्रदीप उप्पूर (निर्माता, सीआयडीचा आधारस्तंभ). एक सदैव हसतमुख प्रिय मित्र, प्रामाणिक आणि स्पष्ट, मनापासून उदार असलेला.
तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्यातील महत्वाचा अध्याय संपलाय…लव्ह यू अँड मिस यू बडी,” अशी पोस्ट करत शिवाजी साटम यांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलंय.