17/03/2023 16:55:23 PM Sweta Mitra 17
बॅडमिंटनमध्ये भारताची एकमेव ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिचा आज वाढदिवस आहे. सायना आज 33 वर्षांची झाली आहे. सायनाचा जन्म 1990 साली हरियाणाच्या हिसार येथे झाला. बॅडमिंटनच्या खेळात सायनाने मोठं यश संपादित केलं. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची खेळाडू म्हणून पदक मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल सायनाला राजीव गांधी खेलरत्न पद्मश्री, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सायनाने बॅडमिंटन कोर्टात 24 आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. 2012 मध्ये लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून सायना नेहवालने सर्वांना चकित केले. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय शटलर ठरली. अनेक वेळा सायनाने देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. देशात आणि परदेशात खेळल्या गेलेल्या अनेक सामन्यात तिने सुवर्ण व रौप्यपदके जिंकून देशाचे नाव मोठं केलं.