17/03/2023 16:56:40 PM Sweta Mitra 31
टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंत याने बुधवारी सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो काठीच्या साहाय्यानं तलावामध्ये एन्जॉय करताना दिसतला होता. अशातच आता ऋषभचा आणखी एक फोटो आता समोर आलाय. भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा स्टार ऑलराऊंडर युवराज सिंह याने ऋषभ पंतची भेट घेतली. त्यावेळीचा एक फोटो युवराजने शेअर केला आहे.
ऋषभला भेटल्यावर युवराज सिंग याने दोघांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्याचा कॅची कॅप्शन देखील त्याने दिलंय. On to baby steps, असं युवराज मजेशीर अंदाजात म्हणतो. हा चॅम्पियन पुन्हा उठणार आहे. ऋषभला भेटून खूप आनंद झाला आणि तो खूप सकारात्मक व्यक्ती तसेच मजेदार व्यक्ती आहे. यावर मात करण्याचे बळ मिळो, अशी इच्छा देखील युवराजने व्यक्त केली आहे.
पुन्हा क्रिकेट खेळण्यासाठी युवराजने ऋषभला भेटून लवकर बरा होण्यास पाठबळ दिलंय. गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याच्या कारला अपघात झाला होता. त्यानंतर त्याच्यावर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. मात्र, युवराजची भेट स्पेशल ठरली आहे.
युवराज सिंग म्हणजे एकदम जॉली खेळाडू. युवराजने कॅन्सरशी फाईट करत पुन्हा क्रिकेटच्या मैदानात कमबॅक केलं. कॅन्सर आहे माहित असताना देखील युवीने 2011 चा वर्ल्ड कप खेळला... फक्त खेळलाच नाही तर युवीने भारताला वर्ल्ड कप जिंकवून देखील दिलाय. तर 2007 चा वर्ल्ड कप जिंकण्यात देखील त्याचा सर्वात मोठा वाटा होता.