17/03/2023 16:59:45 PM Sweta Mitra 25
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनाताना पहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कोळशाने भरलेल्या ट्रकला भरधाव वेगात जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिली या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
विजय विश्वनाथ खैर (वय ७४), राहुल बाळकृष्म कुलकर्णी (वय ४३ रा. दोघे सातारा), हेमंत राउत (वय ३५ रा. सातारा) अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. या बाबत मिळालेली माहिती अशी ः कामानिमित्त मुंबईला गेलेले तिघे जण मुंबईहून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने साताऱ्याकडे येत होते.
उर्से टोल नाक्याजवळ एका वाहनाला डाव्या बाजूने वेगात ओव्हरटेक करीत असताना डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला उभी असलेला कंटेनर त्यांना दिसला नाही. ते थेट कंटेनरला मागून धडकले. त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनरमध्ये अडकलेली मोटार बाहेर काढून मृतदेह तळेगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यातील दोघे एका कंपनीच्या कामासाठी मुंबईला गेल्याचे समजते. अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलिस करीत आहेत.