17/03/2023 17:02:14 PM Sweta Mitra 14
'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे मधुराणी प्रभुलकर हे नाव आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. ती अनेकदा खूप सुंदर अशा वैचारिक पोस्ट शेअर करताना दिसते.
नुकतीच तिची महिला दिनाची पोस्ट चर्चेत होती. त्यानंतर तिनं 'अरुंधती'च्या या वयातील लग्नाविषयी मत मांडले. ती साकारत असलेली अरुंधती आता नव्या नात्यात अडकली आहे. नवा संसार तिने सुरू केला आहे. याच विषयी आज मधुराणी बोलली आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेत नुकताच आशुतोष आणि अरुंधतीचा लग्नसोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नावरनं देशमुखांच्या घरात तुंबळ युद्ध रंगलेलं पहायला मिळालं. पण सर्वांचा विरोध झुगारून अरुंधतीने हे लग्न केलेच.
आता अरुंधती आणि आशुतोष यांनी नव्या संसाराची सुरुवात केली आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अरुंधती आणि आशुतोष आपल्या नव्या नात्याची सुरुवात करताना दिसत आहेत.