18/03/2023 17:34:56 PM Sweta Mitra 401
अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्यदिव्य राम मंदिराचं बांधकाम नियोजित वेळेच्या तीन महिने आधी पूर्ण होण्याची शक्यता आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टशी संबंधित एका अधिकाऱ्यानं शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचे बांधकाम मुदतीपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
रामजन्मभूमी येथील ट्रस्टच्या कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, मंदिराचे काम निर्धारित तारखेच्या तीन महिने आधी पूर्ण होईल, त्यामुळे आता आम्ही डिसेंबर 2023 ऐवजी सप्टेंबर 2023 पर्यंतचा वेळ निर्धारित केला आहे. या नव्या तारखेनुसार, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या जवळपास 6 महिने आधी राम मंदिराच्या उभारणीचं काम पूर्ण होणार आहे.
रामजन्मभूमी येथील ट्रस्टच्या कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, मंदिराचे काम निर्धारित तारखेच्या तीन महिने आधी पूर्ण होईल, त्यामुळे आता आम्ही डिसेंबर 2023 ऐवजी सप्टेंबर 2023 पर्यंतचा वेळ निर्धारित केला आहे. या नव्या तारखेनुसार, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या जवळपास 6 महिने आधी राम मंदिराच्या उभारणीचं काम पूर्ण होणार आहे."