18/03/2023 17:41:58 PM Sweta Mitra 1
दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची एक मोठी संधी चालून आलीय. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने तब्बल 9212 पदांसाठीची भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यात 107 पदे महिलांसाठी तर उर्वरित 9105 पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 27 मार्चपासून सुरू होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 25 एप्रिल 2023 पर्यंत अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतील.
शैक्षणिक पात्रता : 10वी पास असावा.
काही पदांसाठी 10वी पास. ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल) सोबत अवजड वाहन चालक परवाना असावा
अधिक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी
वय श्रेणी : 18-27 वर्षे (एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षे आणि ओबीसीसाठी तीन वर्षांची सूट दिली जाईल)
परीक्षा फी : 100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
किती पगार मिळेल:
निवडलेल्या उमेदवारांना स्तर-3 (रु. 21,700 – 69,100) ची वेतनश्रेणी मिळेल.