18/03/2023 17:44:52 PM Sweta Mitra 19
मराठी चित्रपट सृष्टीत सहाय्यक भूमिका निभावणारे ज्येष्ठ कलाकार भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले. भालचंद्र यांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये अभिनय केलाय. गेल्या चार ते पाच दशकांच्या कारकिर्दीत भालचंद्र यांनी नवरा नको गं बाई, पिंजरा, मुंबईचा जावई , सोंगाड्या, थरथराट, खतरनाक अशा अनेक सिनेमांमधून दमदार भूमिका साकारल्या आहेत.
भालचंद्र कुलकर्णी अनेकदा त्यांच्या सहाय्यक भूमिकेसाठी ओळखले जातात. भालचंद्र गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. काहीच महिन्यांपूर्वी त्यांना कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ते अनेक वर्षांनंतर प्रेक्षकांच्या समोर आले होते.
भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक सुद्धा होते. याशिवाय चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव केला. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.